Medical Health Checkup Camp – Kopargaon Branch

” निमा “अमृत महोत्सव वर्षा निमित्त  – ‘ निमा ‘ कोपरगांव शाखा  व डॉ.. आचारी हास्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात डॉ. शिरीष शेळके ( ENT Surgeon), डॉ.  इंद्रनिल वाघ( Gynaecologist), डॉ. अनंतकुमार भांगे (Pediatrician), डॉ. दीपाली आचार्य (Cosmetologist), डॉ. प्रसाद काळवाघे (Dental Surgeon), डॉ..विलास आचारी व डॉ.अभिजीत आचार्य (General Physician) यांनी रूग्ण तपासणी करून योग्य तो सल्ला दिला. शिबिरात 215 पेशंट तपासले. अल्प दरात ईसीजी ,सोनोग्राफी, युरीक acid, ब्लड शुगर, Bone marrow density ( हाडांचा ठिसूळपणा ), थायराॅईड test, Otoscope द्वारे कानाची तपासणी करण्यात आली. शिबीर यशस्वी करण्यासाठी – निमा कोपरगांव शाखेचे अध्यक्ष डॉ. नितीन झवर, डॉ.जितेंद्र रणदिवे,  डॉ. सोनिया रणदिवे, डॉ. विवेक सुर्यवंशी , डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. अरुण भांडगे व सर्व सभासद *व हास्पिटल स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ..विलास आचारी यांनी प्रास्तविक केले. व डॉ..सुषमा आचारी यांनी स्वागत केले तर डॉ. अभिजीत आचार्य यांनी आभार मानले.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.