21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त निमा संघटना माढा तालुका व पतंजली योग समिती मोडनिंब यांच्या सहकार्याने योग दिन साजरा करण्यात आला. शिवपार्वती मंगल कार्यालय मध्ये सकाळी सहा ते आठ या वेळेत हा कार्यक्रम झाला.
तत्पूर्वी दिनांक 20 रोजी उमा विद्यालय मोडनिंब, संगण बसवेश्वर प्रशाला मोडनिंब व संजय मामा शिंदे विद्यामंदिर मोडनिंब यातील बाराशे विद्यार्थी रॅलीमध्ये मध्ये सहभागी होते. पतंजली योग समितीतर्फे मोहन कुंभार व महेश पवार यांनी योग दिनानिमित्त प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी निमा संघटना तालुकाध्यक्ष डॉक्टर सुरेश व्यवहारे व डॉक्टर संतोष दळवी आदी सदस्यांसह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.