NIMA Day Celebration – Pimpri Chinchwad Branch

 निमा अमृतोत्सवच्या उद्घाटन समारंभात हॉटेल सयाजी, वाकड,  पुणे येथे जमलेल्या ५० पेक्षा अधिक निमा सदस्यांच्या उपस्थितीत निमा अमृतोत्सवचा उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सुधिर काटे सरांनी धन्वंतरी स्तवन म्हणून केली. याच कार्यक्रमात डॉ तेजस गुंडेवार,  इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट, रुबी हाॅल क्लिनिक यांचे इनफर्टिलिटी विषयावरील  लेक्चर झाले. अतिशय समर्पक शब्दात त्यांनी  इनफर्टिलिटी आणि ताण यावर  सुंदर विवेचन केले.  या कार्यक्रमाचे आयोजन सिप्ला फार्मा कंपनी तर्फे करण्यात आले होते.   सोबतच सर्वांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वादही घेतला.या कार्यक्रमास  निमा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ सुहास जाधव सर, निमा सेंट्रलचे प्रतिनिधी डॉ माळशिरसकर,  डॉ  माटे,  डॉ कोकाटे, निमा पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष डॉ सत्यजित पाटील,  खजिनदार डॉ सुनील पाटील तसेच वुमन्स फोरमच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ ज्योती माटे, अध्यक्ष डॉ प्रज्ञा खोसे,  सचिव डॉ कल्पना एरंडे आणि खजिनदार डॉ मयुरी मोरे आणि निमा पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.सिप्ला फार्माचे विभागीय प्रमुख श्री श्रीवास्तव आणि स्वप्निल दिवटे हे यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.