दिनांक १३ एप्रील रोजी *निमा स्थापना दिवस व अमृत महोत्सवी वर्ष* निमित्याने *मेहकर निमा व निमा वुमन्स फोरम्* च्या वतीने *रक्तदान शिबीर* घेण्यात आले.या शिबीराचे ऊद्घाटन डॅा. सुभाष लोहीया यांच्या हस्ते व डॅा. डिगांबर वर्हाडे व डॅा. आशिष अवस्थी यांच्या प्रमुख ऊपस्थीतीत झाले. यामध्ये मेहकर निमाचे अध्यक्ष डॅा. सुनिल भराडे यांनी प्रथम सपत्नी रक्तदान करुन शिबीराला सुरवात केली. मेहकर निमाच्या बहुतांश सदस्यांनी रक्तदान करुन 60unit चा पल्ला गाठला.रात्री 8 वाजता डॅा. धनराज राठी व डॅा. विलास वर्हाडे यांच्या प्रमुख ऊपस्थीतीत व डॅा. सुनिल भराडे यांच्या अध्यक्षतेखाली भगवान धन्वंतरीचे पुजन करुन ज्येष्ठ *धन्वंतरी पुरस्कार सोहळा* पार पडला. पुरस्काराचे मानकरी डॅा. आशिष अवस्थी व डॅा. विणा देशमुख होते. यावेळी प्रास्ताविक डॅा. नंदकुमार पिसे यांनी केले व निमा संघटनेची स्थापनेपासुनची आतापर्यंत वाटचाल सांगितली. तसेच अध्यक्षीय भाषणात अमृत महोत्सवी वर्षभराचे काय कार्यक्रम घेता येतील हे सांगितले. यावेळी सुत्रसंचलन डॅा. संतोष नागोलकर तर आभार प्रदर्शन डॅा. सौ. स्वाती सानप यांनी केले. यावेळी *विदर्भ गौरव पुरस्कार* प्राप्त डॅा. संतोष नागोलकर यांचा शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सांगता *स्वरुची भोज* ने झाली. यावेळी कोर कमीटीचे सचिव- डॅा. निलेश सानप डॅा. प्रशांत दिवठाने , डॅा. सागर आव्हाळे, डॅा. अमोल कानोडजे, डॅा. ऊज्वल खडे, डॅा. महेश रोकडेडॅा. प्रविण देशमुखडॅा. विशाल सारडा डॅा. सुनिल केंधळे ऊपस्थीत होते.








