दि. 13 एप्रिल 2022 रोजी निमा संघटनेचा 74 वा वर्धापन दिन आणि अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण यानिमित्ताने निमा सोलापूर शाखेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनायकजी टेंभुर्णीकर सर, तर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापुरातील सुप्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी सोलापूरचे सचिव डॉ. राजीवजी प्रधान सर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निमा सोलापुरचे अध्यक्ष डॉ. रुपेश येडके सर यांनी केले. त्यानंतर संवेदना रक्तदान शिबिराच्या सोलापुरातील दहा केंद्रांच्या केंद्रप्रमुखांचे स्वागत करण्यात आले. अमृत महोत्सव लोगो असलेला केक कार्यक्रमाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. यावेळी निमा सोलापुर आणि निमा स्टुडन्ट फोरम, सोलापूर जिल्हा यांचे अमृत महोत्सव व्यवस्थापन मंडळ जाहीर करून पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यासह स्टुडन्ट फोरमच्या ब्राउचर आणि मेंबरशिप ड्राईव्ह पोस्टरचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निमा सोलापूरचे कार्यकारी सदस्य डॉ. धनंजय कुलकर्णी सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन निमा वुमन्स फोरम, सोलापूरच्या अध्यक्षा डॉ. स्मिता बुब यांनी केले. यावेळी निमा केंद्रीय सहसचिव डॉ. अनील पत्की सर, निमा अमृत महोत्सव व्यवस्थापन मंडळ सोलापूरचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत कुलकर्णी सर, एमसीआयएम सदस्य डॉ. सचिन पांढरे सर, निमा सोलापूर, निमा वुमन्स फोरम आणि स्टुडन्ट फोरम सोलापूरच्या कार्यकारी सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती. संवेदना रक्तदान शिबिर प्रमुख डॉ. नितीन बलदवा सर आणि प्रमुख पाहुणे यांचे मनोगत नंतर अध्यक्षीय भाषण व अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निमा सोलापूर, वुमन्स आणि स्टुडन्ट फोरम, सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.














