Yoga Day Celebration – Nanded Branch

निमा चे 75 वे अमृत महोत्सव निमित्ताने आज 21 जून 22 रोजी निमा नांदेड तर्फे 8 वा अंतरराष्ट्रीय योगा डे नांदेड निमा व  सुप्रसिद्ध गजानन पाटील योग क्लास यांचे संयुक्त विद्यमाने योग  गुरू श्री गजानन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली खाली संपन्न झाला. या योगा डे ची सुरुवात  प्रमुख पाहुणे सौ. अपर्णाताई नेरलकर, महिला व बालकल्याण सभापती नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, डॉ अविनाश वडजे, अध्यक्ष निमा नांदेड, डॉ.श्रीराम कल्याणकर सहसचिव निमा महाराष्ट्र, डॉ. डी.लक्ष्मण माजी. अध्यक्ष. निमा नांदेड,  श्री गजानन पाटील योग शिक्षक यांचे शुभ हस्ते दीप प्रज्वलन करुन झाली.या कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत योग गुरू गजानन पाटील यांनी अतिशय  सुंदर रीतीने म्हणजे पुस्तक देऊन केले. व जवळ पास दोन तास सर्व साधकाकडून योग करून घेतला. व उत्तम आरोग्य,शारीरिक ,मानसिक आरोग्य यावर अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले.कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात  डॉक्टर योग साधक उपस्थित व्होते

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.